युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) ने 2019 मध्ये म्हटले आहे की पृथ्वीवरील मातीचा वरचा थर पुढील 60 वर्षांत नष्ट होऊ शकतो. वरील ख्यातनाम आंतराष्ट्रिय संस्थेने म्हटले आहे की,मातीचा अगदी वरचा 3 सेंटीमीटर जाडीच्या निर्मितीसाठी 1,000 वर्षे लागतात. पृथ्वी वरील शेतजमिनी वरील मातीची थर 30 फुटबॉल मैदाने प्रती मिनिट इतक्या गतीने नष्ट होत आहे. इति..30 मार्च 2023.
आपल्या सर्वास माहीत असल्या प्रमाणे आज शेतजमिनी रासायनिक खते व विषारी कीटकनाशकांच्या अती वापराने निकस होऊन नापीक होण्याच्या मार्गावर आहेत.वर उल्लेख केलेल्या संशोधन संस्थे तर्फे उपलब्ध माहिती नुसार आपण आपल्या शेतजमिनीवर फक्त 60 वेळा खरीप पेरणी सिझन घेऊ शकतोत इतकी पोषकताच जमिनीत शिल्लक राहिली आहे. जमिनीची पोषकताच (जमिनीतील सेंद्रिय पदार्थ) शिल्लक राहत नसेल तर पुढील पिढी अश्या निकस जमिनीत पिके पिकवतील कशी व शेती टिकेल कशी?
वरील बाबतीत मागील 45 वर्षा पासून जिवाणू खते उत्पादनाच्या माध्यमातून जमिनीचे आरोग्य राखण्याचा सतत प्रयत्न के-फर्टस् लॅब तर्फे होत आहे हे आपण जाणताच.याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून के-फर्टस् लॅब तर्फे श्री सत्यनारायण मंत्री यांच्या चिखली येथील शेतीवर भूमाता तत्व शुध्दीकरण-पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमातच रासायनिक शेती करणारी शेतकरी – मंडळींना रासायनिक शेती कडून जैविक/सेंद्रिय शेती कडे कसे वळावे या बाबतीत श्री दिलीपराव देशमुख बारडकर व इतर तज्ञा तर्फे मार्गदर्शन होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी श्री बाऱ्हाटे साहेब भूषविणार आहेत.तरी सर्व शेतकरी बंधूंना विनंती की या भूमाता तत्व शुध्दीकरण कार्यक्रमास उपस्थित राहून आपली शेत जमीन परत कशी रसायनिक खते मुक्त व विषारी कीटक नाशक मुक्त होईल व या बाबतीत चे तंत्र समजून घ्यावे व लाभांन्वित व्हावे,ही विनंती.
दिनांक: 30 जानेवारी 2024
वेळ: सकाळी 11 वाजता.
स्थळ श्री सत्यनारायण मंत्री यांचे चिखली (नांदेड – मालेगाव रस्त्यावरील) येथील शेत.
विनीत:
के-फर्टस् लॅब,नांदेड🙏
#malegoan #nanded #kfertslab #bioferta #farmerlife #agriculture #composting #NaturalFarming #oranganic #farming #india #maharashtra